चाळीसगाव महामार्ग पोलीसांचे चालक दिनानिमित्त वाहन चालकांसोबत “चाय पे चर्चा”

बातमी कट्टा:- चालक दिनानिमित्त चाळीसगाव महामार्ग पोलीसांच्या वतीने चाय पे चर्चा करत चालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांना वाहतूकीचे नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.वाहन चालकांनी यावेळी चाळीसगाव महामार्ग पोलीसांचे आभार मानत वाहतूक नियमांचे तंतोतंत पावन करण्याचे आश्वासन दिले.

दि.17 रोजी 12 ते 13 वाजेच्या दरम्यान  महामार्ग पोलीस केंद्र  चाळीसगाव हद्दीत चालक दिनानिमित्तअपर पोलीस महासंचालक,(वाहतुक), महाराष्ट्र राज्य, मुंबई डॉ.रवींद्र सिंगल,पोलीस अधिकक्षक, महामार्ग पोलीस, ठाणे परिक्षेत्र, ठाणे डॉ.मोहन दहिकर,पोलीस उप अधीक्षक, महामार्ग पोलीस,नाशिक विभाग, नाशिक प्रदीप मैराळे, मा. पोलीस निरीक्षक भामरे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली चाळीसगाव महामार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पवार पोलीस अधिकारी सुभाष सोनवने आणि महामार्ग पोलीस अंमलदार यांनी नांदगाव चौफ़ुली येथे कर्तव्यादरम्यान वाहन चालक यांना थांबवून त्यांच्याशी संवाद साधून त्यांनी कोविड काळात केलेल्या कामाबद्दल तसेच ते सध्या करत  असलेल्या अनेक कार्यबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन करून  त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला व “चाय पे चर्चा” या माध्यमातून एकूण ४० वाहन चालक यांना  पुष्पगुच्छ, पाण्याची बॉटल व चहा देऊन वाहतुक नियम पालन करणेबाबत चर्चा करुण त्यांचे सत्कार करून त्यांचे आभार मानले व त्यासोबत वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना देऊन त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी महामार्ग पोलीस विभागाकडून शुभेच्छा देण्यात आले.

WhatsApp
Follow by Email
error: