
बातमी कट्टा:- अंधाराचा फायदा घेऊन शेतातील कापून ठेवण्यात आलेले हरभरे चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांनी अंदाजे 10 ते 12 क्विंटल हरभरा चोरी केला आहे.शेतात बॅक्टरीचे उजेड बघून कोणतरी येत असल्याचे बघताच चोरांनी चप्पलासोडून घटनास्थळावरून धुम ठोकली.

धर्मेंद्र रोहिदास कोळी यांची शिरपूर तालुक्यातील टेकवाडे शिवारात शेती आहे.त्यांनी शेतात हरभरा पिकाची लागवड केली होती.दोश एकरातील हरभरा पिकाची तोडणी करुन त्याचे ढिग शेतात ठेवण्यात आले होते.रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतातील ते हरभराचे ढिगांची चोरी केली.नागरिकांना चोरीची चाहूल लागताच धर्मेंद्र कोळींसह इतर जण शेतात गेले असता.बॅक्टरीचा उजेड बघून चोरट्यांनी डोक्यावरील हरभराचे काही ढिग सोडून घटनास्थळावर चप्पला सोडून पळ काढला.त्यांनी 10 ते 12 क्विंटल हरभरा चोरी केल्याचे शेतकरी धर्मेंद्र कोळी यांनी सांगितले आहे.
