बातमी कट्टा:-घरात कोणीही नसतांना भरदुपारी अचानक झोपडीला लागलेल्या आगीत तीन वर्षीय बालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.घरात झोपलेला असतांना आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यात बालकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील पडावद येथील वरच्या गावात गावाजवळील खळ्यातील झोपडीत कमल पावरा हे त्यांच्या पत्नी व दोन अपत्य कुटुंब राहत होते.काल दि 10 रोजी कमल पावरा व शारदा पावरा या शेतकामासाठी बाहेर गेलेले होते तर झोपडीत झोपलेल्या रुपेश कमल पावरा या तीन वर्षीय बाळाची जबाबदारी छोट्या बहिणीवर सोपविण्यात आली होती. काल दुपारी चार वाजेच्या सुमारास झोपडीला अचानक आग लागली. बाहेर खेळत असलेल्या मुलीने गावाकडे धाव घेतली जवळच्या शेतात काम करत असलेले ग्रामस्थांना माहिती दिली नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
घटनास्थळी अग्निशामक दल दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले मात्र त्यावेळेत आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेजारील इतर खळ्यांना देखील आग लागल्याने आगीत सर्व काही खाक झाले.यावेळी शारदा पावरा घटनास्थळी दाखल होत तीन वर्षाचे मूल झोपडीत असल्याचे घटनास्थळी सांगितले मात्र तोपर्यंत झोपडीतील रूपेश कमल पावरा या बालकाचा आगीमुळे होरपळून मृत्यू झाला होता.