चिमुकल्या ऋषीकेशचा पूरग्रस्तांसाठी 5 हजाराचा निधी

बातमी कट्टा: पुण्याच्या इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या ऋषीकेश भोई या चिमुकल्याने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेत पूरग्रस्तांना मदत म्हणून 5 हजाराचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला आहे. त्याने या निधीचा धनाकर्ष निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना सुपूर्द केला.

ऋषीकेशचा येत्या 17 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. तो तळोदा येथे आपल्या आजोळी आला आहे. आपला वाढदिवस साजरा न करता झालेली बचत पूरग्रस्तांसाठी देण्याची कल्पना त्यांने वडिलांसमोर मांडली. ऋषीकेशचे वडील पंकज भोई यांनीदेखील त्याला प्रोत्साहन दिले. आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे ऋषिकेशने सांगितले.

WhatsApp
Follow by Email
error: