
बातमी कट्टा:- चिमुकल्या बहिण भावांचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळून आल्याची दुर्दैवी घटना आज दि ४ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.या प्रकरणी थाळनेर पोलिसांकडून रात्री उशीरापर्यंत कार्यवाही सुरु होती.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि ४ रोजी सायंकाळी थाळनेर गावाजवळ तापी नदीपात्रात दोन चिमुकले पाण्यात रंगत असल्याचे आढळून आले. यावेळी तात्काळ पोहणाऱ्यांनी तापी नदीत उडी घेऊन दोघा चिमुकल्यांना पाण्यातून बाहेर काढले. यावेळी थाळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून दोन्ही चिमुकल्यांना मृत घोषित केले.यात मृत मुलाचे नाव कार्तिक सुनील कोळी वय ५ व लहान मुलगी चिमू सुनिल कोळी वय ३ असे आहे. घटनेची माहिती मिळताच थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
दोन्ही चिमुकले बहिण भाऊ तापी नदीपर्यंत पोहचले कसे ? त्यांना तापी नदी पर्यंत कोण घेऊन गेले ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
