चॉकलेट घ्यायला आला नि सोनसाखळी घेऊन पळाला…

बातमी कट्टा:-चॉकलेट घेण्याचा बहाण्याने दुकाना जवळ येऊन किराणा दुकानातील महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत ओढून दोन संशयित मोटरसायकलीने पळून गेल्याची घटना आज दि 28 रोजी सकाळच्या सुमारास घडली.हे दोन्ही संशयित मोटरसायकलीने जात असतांनाच सी.सी.टी.व्ही कँमेरात चित्रीत झाले आहे.दुकनातून लांब अंतराने बिस्कीट दिल्यानंतर गळ्यातील मंगलपोट ओढता आली नसल्याने संशयितने पुन्हा चॉकलेट मागितले यावेळी बरिणीतून चोकलेटच काढतांना मात्र मंगलपोत ओढून संशयित फरार झाले आहेत.

शिरपूर शहरातील वासुदेव बाबा मंदीराजवळील सदाशिव नगर येथे सौ जया रंगराव पाटील या त्यांच्या अमोल प्रोव्हीजन नावाच्या किराणा दुकानात होत्या यावेळी दोन अनोळखी ईसम मोटरसायकलीने दुकानाजवळ आले.त्यातील एकाने दुकनातून बिस्कीट मांगितले यावेळी जया पाटील यांनी दुकानातून बिस्कीट काढून दिले.मात्र लांब अंतराहून बिस्कीट दिल्याने संशयिताला गळ्यातील सोन्याची मंगलपोत काढता आली नसल्याने त्याने पुन्हा चॉकलेट मांगितले.

यावेळी जया पाटील या समोरील चॉकलेटच्या बरणीतुन चॉकलेट काढत असतांना त्या संशयिताने जया पाटील यांच्या गळ्यातील 24 ग्रँम वजनाची 73 हजार 750 हजार किंमतीची मंगलपोत ओढून घेत मोटारसायकलीवर बसून मोटारसायकलीने पळ काढला.यावेळी जया पाटील यांनी जोरजोराने आरोळ्या मारल्यानंतर जवळील नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला मात्र ते मोटरसायकलीवर असल्याने पळून गेले एका सी.सी.टी.व्ही कँमेरात ते मोटरसायकलीने जात असल्याचे चित्रीत झाले आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले. याबाबत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: