बातमी कट्टा:- चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी आलेल्या दोघांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.यात विधी संघर्ष बालकांकडून मोटरसायकली जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक शिवाजी बुधवंत यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन जण चोरीच्या मोटारसायकलची विक्री करण्यासाठी चाळीसगाव रोड चौफुलीवर येत आहेत.त्यामुळे श्री. बुधवंत यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने सापळा रचून सकाळी दहाच्या सुमारास दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले.त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी दोंडाईचा,शिरपूर, शहादा, नंदुरबार येथून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.त्यांच्या ताब्यातून ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. यात दोंडाईचातील ३,शहाद्याची एक, नंदुरबारची एक, धुळे शहरातील दोन मोटारसायकली आहेत.सदरची कारवाई सहायक पोलीस निरिक्षक प्रकाश पाटील,पोलीस उपनिरिक्षक योगेश राऊत, पोलीस उपनिरिक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पोहेकाँ संजय पाटील, प्रकाश सोनार, संदीप सरग, अशोक पाटील, कुणाल पानपाटील, रविकिरण राठोड, उमेश पवार, विशाल पाटील आदींनी केली आहे.