चोरीच्या 7 मोटरसायकलांसह 2 संशयित पोलीसांच्या ताब्यात

बातमी कट्टा:- रस्त्यावरुन रॉयल इन्फील्ड बुलेट चोरी झाली होती.याबाबत पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांकडून चोरीच्या मोटरसायकलींचा शोध सुरु असतांना मोटरसायकल चोरी करणाऱ्यांचा धागादोरा सापडला आणि पोलीसांनी तब्बल 3 लाख 5 हजार किंमतीच्या 7 मोटरसायकलीसह दोन संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले आहे.

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे दि 12 जूलै रोजी एम.एच 15 जी.जे 4440 क्रमांकाची रॉयल इफील्ड 350 सी.सीची बुलेट ही मोटरसायकलची चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.पिंपळनेर येथील वर्दळीच्या ठिकाणी बाजारपेठ,मंगलकार्यालय,लॉन्स हॉस्पिटल परिसरात मोटरसायकली चोरी झाल्याने पोलीसांकडून या बाबत तपास सुरु होता.यावेळी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे रात्री गस्त घालत असतांना पिंपळनेर शहरातील यादु उर्फ यादया रमेश देसाई रा.लोणेश्वर पिंपळनेर व अजय उर्फ आज्या शिवाजी गांगुर्डे रा. मालच्यापाडा पिंपळनेर या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता हे दोघेही जण मोटरसायकल चोरी करुन नंबर प्लेट मध्ये बदल करुन त्या कमी किमतीत विक्री केल्याची दोघांनी कबुली दिली आहे.या दोघा संशयितांकडून 3 लाख 5 हजार किंमतीच्या चोरीच्या 7 मोटरसायकल मिळुन आले आहेत.पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत मोटरसायकली जप्त करण्यात आले आहे.

सदर कारवाई सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे ,प्रविण अमृतकर,देवेंद्र वेन्द्रे,रविकुमार राठोड,मकरनद पाटील,भुषण वाघ,ग्यानसिंग पावरा आदींनी कारवाई केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: