छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची विटंबना करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करावी,

बातमी कट्टा:- महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची विटंबना करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी करत विविध संघटनेतर्फे निवेदनाद्वारे घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे.

कर्नाटकची राजधानी बँग्लोर येथील सदाशिव नगर येथे दि 16 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्री अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची विटंबना करण्यात आली होती. त्याचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी शिरपूर शहरातील हिंदुराष्ट्र सेना,श्री .शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरपूर विभाग, वि.ही. प.बजरंग दल,एकीकरण समिती, श्रीमंत योगी ग्रुप शिरपूर तर्फे तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देऊन सदर निंदनीय घटनेचा जाहीर नेषध नोंदवत विटंबना करणाऱ्यांना विरुध्द महाराष्ट्र शासनाकडून योग्य ती कठोर कारवाई करण्यात येवुन,प्रशासनाकडून कर्नाटक सरकारला संबधीत विरुद्ध कारवाई करण्याबाबत पत्र पाठवावे असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: