जंगलात आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह….

बातमी कट्टा:- जंगलात १० जानेवारी रोजी सकाळी एका अनोळखी युवकाचा कुजलेला व गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याप्रकरणी सांगवी पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गुऱ्हाडपाणी परिसरातील सामऱ्यादेवी ते वाल्यापाणी रस्त्यालगत कोडीद शिवारात असलेल्या जंगलात सोमवारी १० जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास २० ते २५ वयोगटातील युवकाचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत दिसून आला. सदर युवकाने कापडी बेल्टने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.या घटनेची माहिती गुर्हाडपाणीचे पोलीस पाटील सरकार पावरा यांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ सांगवी पोलीसांना घटनेची माहिती दिलीशश उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने सांगवी पोलीस ठाण्याचे पीएसआय भिकाजी पाटील, पोकॉ भूषण चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र बागुल यांनी घटनास्थळी अनोळखी मृतदेहाची तपासणी करून मयत घोषित केले.सदर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.याप्रकरणी सांगवी पोलीसांत गुऱ्हाडपाणी चे पोलीस पाटील सरकार पावरा याच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पीएसआय भिकाजी पाटील करीत आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: