जमिनीतून येणारा आवाज नेमका कसला ?ग्रामस्थ चिंतेत ! गेल्या दोन वर्षांपासून वारंवार जाणवतोय आवाज,यावळेस आवाजाची तिव्रता वाढली…

बातमी कट्टा:- जमिनीच्या भूगर्भातून स्फोट सद्रृष्य आवाज येत असल्याचे गावकऱ्यांना जाणवत आहे.विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपूर्वी हा आवाज येत असून गेल्या वर्षांपासून आवाजाची तिव्रता कमी होती मात्र आता पुन्हा त्या आवाजाच्या तिव्रतेत वाढ झाल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील आंबे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या धवळीविहीर या गाव परिसरात जमीनीमधून स्फोट सद्रृष्य आवाज येत असल्याचे येथील गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.२०२२ पासून वारंवार हा आवाज जाणवत आहे गेल्या वर्षी या आवाजाची तीव्रता कमी होती मात्र यावर्षी पुन्हा या ऑगस्ट महिन्यांपासून या आवाजाची तिव्रता जाणवू लागली आहे.

या संदर्भात शिरपूर तहसीलदार आणि भुजल सर्वेक्षण विभागाचे भूवैज्ञानिक यांना कळविण्यात आले होते. याबाबत भूवैज्ञानिकांनी धवळीविहीर गावाला भेट देत गावकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.हा आवाज नेमका कसला ? याबाबत अद्याप समजू शकलेले नाही.मात्र यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.धवळीवीहीर सोबतच जवळ असलेल्या पाड्यांना देखील हा आवाज येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: