जय हरी विठ्ठल ! प्रती पंढरपूर बाळदे येथे उद्या यात्रोत्सव

बातमी कट्टा:- उद्या दि. 10 जुलै रोजी खान्देशातील प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या शिरपूर तालुक्यातील बाळदे येथिल विठ्ठल रुख्मिनी मंदिरात आषाढी निमित्त भरणाऱ्या यात्रोत्सवाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पहाटे 4 वाजता विठ्ठल रुख्मिनी यांच्या मूर्तीचे अभिषेक, पूजा व आरती होईल, सकाळी 6 ते 6.30 काकड आरती, भजन, सकाळी 7 वाजता विष्णुसहस्र नाम जप, पसायदान, दैनंदिन आरती, तसेच 7.30 ला महापूजा, दिंडीचे स्वागतसह अन्य सोपस्कार पार पडतील. विक्रेत्यांसाठी मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात जागा उपलब्ध करून दिली असून दुकानदार दुकाने थाटून सज्ज झाली आहेत.  


                   दर्शनासाठी आजपासून भाविकांची लगबग सुरू झाली असून आषाढी निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदशनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच भाविकांना सुलभ दर्शन व्हावे या दृष्टिकोनातून  अनिरुद्ध बाबा अकॅडमी शिरपूर यांचे150 स्वयंसेवक देखील सेवेसाठी दरवर्षी प्रमाणे सहकार्य करणार आहेत. याचबरोबर आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे पथक दाखल होणार आहे. पंचक्रोशीतील भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: