
बातमी कट्टा:- मुंबईकडे जाणारी पुष्पक एक्सप्रेस रेल्वे पाचोरा ते परधाडे गावाच्या दरम्यान थांबविण्यात आली होती. यावेळी पुष्पक एक्स्प्रेस मधील काही प्रवाशी उतरून रुळावर उभे असतांना यादरम्यान अचानक भरधाव येणाऱ्या एक्सप्रेस रेल्वे रुळावर उभे असलेल्या काही जणांना उडविल्याची धक्कादायक घटना आज दि २२ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.यात ११ प्रवाशींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज दि २२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पाचोरा ते परधाडे गावादरम्यान पुष्पक एक्सप्रेस जात असताना अचानक पुष्पक एक्सप्रेस ही जागेवर थांबली.रेल्वे आग लागल्याची अफवा पसरल्याने पुष्पक एक्स्प्रेस मधील प्रवाशी घाबरून एक्सप्रेसमधून बाहेर उतरून रुळावर उभे राहीले.मात्र त्यादरम्यान समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने रुळावर उभे असलेल्या काही प्रवाशींना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या अपघात ११ प्रवाशींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर ५ ते ६ प्रवाशी जखमी झाले असून याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी ८ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्याचे ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.घटनास्थळी गिरीश महाजन यांच्यासह पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी सह रेल्वे प्रशासन दाखल झाले आहे.जखमींवर उपचार सुरु असून मदतकार्य सुरु आहे.