जवाहर सुतगिरणीत आ.कुणाल पाटील यांच्या पॅनलचे
तीन उमेदवार बिनविरोध, भाजपाप्रणीत पॅनलला झटका

बातमी कट्टा:- जवाहर सूतगिरणीच्या निवडणूकीत आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर शेतकरी पॅनलचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजपा प्रणित विरोधी पॅनलला निवडणूकिच्या सुरुवातीलाच चांगला झटका दिला आहे. दरम्यान भाजपाप्रणित पॅनलला सूचक,अनुमोदकच मिळाला नसल्याने आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर शेतकरी पॅनलचे अमर शिवाजी देसले, गणेश सिताराम चौधरी, सर्जेराव मखा पाटील हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जवाहर शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी  उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दि.20 जून अंतिम मुदत होती. त्यानुसार  सुतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील आणि आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर पॅनलने आपले उमेदवारी अर्ज आज दि.20 जून रोजी निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे दाखल केले. त्यात कापूस उत्पादक शेतकरी या मतदारसंघातून आ.कुणाल रोहिदास पाटील,कन्हैयालाल नानजी पाटील, दत्तात्रय निळकंठ परदेशी, बाबाजी कृष्णा देवरे, प्रमोद बाबुराव कचवे, प्रमोद दुलिचंद जैन, संतोष पंढरीनाथ पाटील, अविनाश भावराव पाटील, नानाभाऊ हिराजी माळी, रमेश लाला पाटील, जितेंद्र रुपसिंग पवार, नागेश नामदेव देवरे, नंदू भालेराव पाटील, दरबारसिंग नारायण गिरासे, बाजीराव हिरामण पाटील, यशवंत दामू खैरनार, गुलाब धोंडू कोतेकर, अनिल बाबुराव कचवे, बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघातून पाटील सर्जेराव मखा, महिला प्रतिनिधी म्हणून पाटील प्रतिभा पंढरीनाथ, ठाकरे नंदिनी प्रविण, इतर मागावर्गीय मतदारसंघातून कुणाल दिगंबर पाटील, विजय संभाजी पाटील, गुलाब धोंडू कोतेकर, एस.सी/एस.टी. मतदारसंघातून रमेश राघो पारधी, अमृत रमेश भिल, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघामधुन भिका विठ्ठल पाटील, सोमनाथ शामला पाटील आणि बिगर कापूस उत्पादक मतदारसंघातून गणेश सिताराम चौधरी, अमर शिवाजी देसले यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी भाजपाप्रणित विरोधी पॅनलला तीन जागांसाठी सूचक,अनुमोदक आणि उमेदवारच मिळाला नसल्याने आ.कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी पॅनलचे तीन उमेदवार बिनिविरोध निवडून आले आहेत, त्यात अमर शिवाजी देसले देऊर खु., गणेश सिताराम चौधरी न्याहळोद, सर्जेराव मखा पाटील,धुळे ह्या तिघा उमेदवारांचा समावेश आहेत. आ.कुणाल पाटील यांच्या पॅनलचे तीन उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशीच बिनविरोध झाल्याने भाजप प्रणित पॅनलच्या पराभवाची घंटा वाजयला सुरुवात झाली आहे. परिणामी यामुळे भाजपाला चांगला झटका बसला आहे. दरम्यान जवाहर सुतगिरणीच्या उज्वल भवितव्यासाठी आणि शेतकरी,कामगारांच्या हितासाठी आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर शेतकरी पॅनलअंतर्गत सक्षम आणि अनुभवी पॅनल देण्यात येणार आहे. अडचणीच्या काळातही सक्षमपणे सुरु असलेला सुतगिरणीसारखा चांगला प्रकल्प बंद पाडण्याचे कपट आणि कामगारांचे भवितव्य उध्वस्त करण्याचा विरोधकांचे कारस्थान जवाहर पॅनल उधळून लावत पुन्हा एकदा आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालीच जवाहर शेतकरी पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील. कोरोनाच्या काळात राज्यातील आणि देशातील अनेक सुतगिरणी,कारखाने,कंपन्या बंद पडल्या,लाखो कामगार बेरोजगार झाले मात्र आ.कुणाल पाटील यांनी जवाहर सुतगिरणीला तेवढ्याच खंबीरपणे चालवत कामगारांना रोजगार देण्याचे काम केले आहे. मात्र सुस्थितीत चालणार्‍या प्रकल्पात राजकारण आणून तो कसा बंद पडेल असा विरोधकांचा डाव असून तो जवाहर पॅनल हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा जवाहर पॅनलचाच जवाहर सुतगिरणीवर झेंडा फडकेल असा विश्‍वास उमेदवारी अर्ज दाखल करतांना उमेदवारांनी व्यक्त केला. यावेळी जवाहर सुतगिरणीचे संचालक विजय देवरे,पंढरीनाथ पाटील,विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील,प्रदिप देसले,भाऊसाहेब बोरसे, शांतीलाल पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: