बातमी कट्टा:- दि 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येणार असून शिरपूर शहरात भव्य सांस्कृतिक रॅली,आदिवासी जनजागृती व समाज प्रबोधन मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि 9 ऑगस्ट रोजी शिरपूर येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येणार आहे.शिरपूर शहरात भव्य सांस्कृतिक रॅली,आदिवासी जनजागृती व समाज प्रबोधन मेळावा शिरपूर शहरातील वघाडी रोड वरील विठ्ठल लॉन्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन आयोजक जागतिक आदिवासी दिवस उत्सव समिती,शिरपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सांस्कृतिक रॅलीचा मार्ग पुढील प्रमाणे
सकाळी 9 वाजता चोपडा जीन आश्रम शाळेपासुन-मेन रोड-बस स्टॅन्ड-गुजराथी कॉम्प्लेक्स-पाचकंदील- बालाजी मंदीर-पारधी पुरा-बौद्धवाडा-पाटीलवाडा-कुंभारटेक-तहसील कार्यालय-पित्रेश्वर रीक्षा स्टाँप-निमझरी नाका मार्गे -विठ्ठल लाँन पर्यत