बातमी कट्टा:- जातोडे गावाने आजतोवरचा इतिहास कायम ठेवत यावर्षी देखील विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध केली असून चेअरमन पदी भरतसिंग राजपूत तर व्हा चेअरमन पदी शिवाजी बुधा महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शिरपूर तालुक्यातील जातोडे विकास सोसायटीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.जातोडे गावात आजतागायत विकास सोसायटीची बिनविरोध निवड झाली आहे.यंदा देखील माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा,माजी उनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, जि.प अध्यक्ष तुषार रंधे,अशोक बापू कलाल,यांच्या मार्गदर्शनाखाली जातोडे गावाची बिनविरोध निवड करण्यात आली.विकास सोसायटी चेअरमन पदी भरतसिंग सत्तरसिंग राजपूत,व्हा चेअरमन शिवाजी बुधा महाजन तर संचालक पदी उदेसिंग भटेसिंग राजपूत,नथा रत्ना राजपूत,नथेसिंग भगवानसिंग राजपूत,अजबसिंग शामसिंग राजपूत,बापु लालसिंग राजपूत,गुलाबसिंग बखतसिंग राजपूत,प्रकाश नारसिंग राजपूत,मगन संतोष धनगर,शंकर राजधर शिरसाठ,
सुमनबाई विक्रम धनगर,शांताबाई गुलाबसिंग राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माजी जि.प.सदस्य उदेसिंग राजपूत व देवेंद्र राजपूत(डि.जे भाऊसाहेब) यांच्या नेतृत्वाखाली माजी उपसभापती जगतसिंग राजपूत,भटेसिंग राजपूत,बखतसिंग राजपूत,सुभाषसिंग राजपूत, जगतसिंग जिभाऊ, रवींद्रसिंग राजपूत, दर्यावसिंग राजपूत, रावसाहेब धनगर, जयसिंग राणा, मोहन राजपूत, रवींद्र राजपूत, जयसिंग राजपूत, हिम्मतसिंग राजपूत, ज्ञानेश्वर राजपूत, लोटन राजपूत, चिंतामन कुंभार,लोटन धनगर,नथ्थु धनगर, सुरेश कोळी,कृष्णा तिरमले,भोजू अहिरे,शिवदास भिल,रोहिदास भिल, यांच्यासह सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने निवडणूक बिनविरोध संपन्न झाली. निवडणूक अधिकारी म्हणून आर. टी.सोनवणे सचिव चंद्रसिंग राजपूत यांनी काम सांभाळले.