
बातमी कट्टा:- धुळे जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदी सोनीताई पंकज कदम यांची तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी ज्योती देवीदास बोरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडणूकीत पीठासन अधिकारी राहुल जाधव आणि सहाय्यक विकास भाऊसाहेब अकलाडे यांनी जाहीर केली समिती सभापती निवडीसाठी धुळे जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
समिती सभापती पदांची निवड जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित सभापती सोनीताई पंकज कदम व ज्योती देविदास बोरसे यांच्या समर्थकांनी जिल्हा परिषद आवारात गुलाल उधळून ढोल ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला,
नवनिर्वाचित सभापतींवर अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला विविध मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापतींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला, दोन्हीही नवनिर्वाचित सभापतींनी जिल्हा परिषद आवारातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हाचे पालकमंत्री गिरीश महाजन, खा.डॉ.सुभाष भामरे, माजी मंत्री आ.जयकुमार रावल, माजी मंत्री आ.अमरिश पटेल, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, गटनेते कामराज निकम यांचे दोघ सभापतींनी आभार मानले.
याप्रसंगी अध्यक्षा धरती देवरे, माजी अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, दिपक बागल, संग्राम पाटील, गोकुळसिंग परदेशी, पंकज कदम उपस्थित होते.