बातमी कट्टा:- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुार नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्या मधील रिक्त झालेल्या जागांची पोटनिवडणूक – २०२१ करीता पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

पोट निवडणूकीचा कार्यक्रम नमुना १ मध्ये तहसिल कार्यालय,जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, गाव चावडी तसेच पोटनिवडणूक होत असलेल्या विभाग/ निर्वाचक गणातील प्रत्येक गावात सूचना फलकावर तसेच जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कळविले आहे.
