जि.प.सदस्या अभिलाषा पाटील यांचा पाठपुरावा,1 कोटी 5 लाखांचा निधी तर 5 गावांसाठी पाण्याची टाकी मंजूर…।

बातमी कट्टा:- धुळे जिल्हा परिषदेतून जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा व पाण्याच्या टाकीसाठी निधी मंजुर करण्यात आला आहे.जिल्हा परिषद सदस्या अभिलाषा भरत पाटील यांच्या पाठपुराव्याने चांदपुरी गावासाठी एक कोटी पाच लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर पाच गावांसाठी पाणीची टाकी मंजूर करण्यात आली आहेत.

शिरपूर तालुक्यातील जि.प.गट वनावल येथील चांदपुरी, गिधाडे,जातोडे,बाबुळदे,रुदावली,भरवाडे आदी गावांसाठी धुळे जिल्हा परिषदेतुन जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा व पाण्याच्या टाकीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. धुळे-नंदुरबार विधानपरिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल,काशीराम पावरा,उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनातून,धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांच्या प्रयत्नांनी,बापूसाहेब अशोक कलाल यांच्या मदतीने वनावल गट जिल्हा परिषद सदस्या अभिलाषा भरत पाटील यांच्या पाठपुराव्याने चांदपुरी गावासाठी 1 कोटी 5 लाख रुपयांची पाणीपुरवठ्याची योजना धुळे जिल्हा परिषदेतून मंजूर करून करण्यात आली आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी चांदपुरी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वणवण फिरावे लागत होते.चांदपुरी ग्रामपंचायतीतर्फे गावांत पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून निधी उपलब्ध करून द्यावा असे पंचायत समितीला निवेदन देण्यात आले होते.याबाबत गावाच्या पिण्याच्या पाणीचा प्रश्न जि.प.सदस्य अभिलाषा पाटील यांना गावकऱ्यांनी सांगितला व पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव धुळे जिल्हा परिषदे मधून लवकरात लवकर मंजूर करून द्यावा यासाठी विनंती करण्यात आली होत. याबाबत सदस्या अभिलाषा भरत पाटील यांनी प्रत्येक मीटिंगवेळी चांदपुरी गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रस्ताव मंजूर करण्यात यावा यासाठी मीटिंगमध्ये विषय लावून धरला होता व त्यासाठी पाठपुरवठा करण्यात आला होता.

या प्रस्तावामध्ये चांदपुरी पासून चार किलोमीटर पर्यंत असलेल्या टेंभे याठिकाणी बोरवेल करून टेंभे ते चांदपुरी पाईप लाईन, गावात मोठी पाण्याची टाकी तसेच गावात सर्वत्र पाईप लाईन यासाठी 1 कोटी 5 लाख रुपये एवढा निधी मंजूर करून दिला असून त्यामुळे गावातील भविष्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई लवकरात लवकर दूर होणार आहे.तसेच गिधाडे, जातोडे,बाबूळदे,रुदावली,भरवाडे, या गावांसाठी पाण्याच्या टाकीची गरज लक्षात घेऊन अभिलाषा भरत पाटील यांच्या पाठपुराव्याने जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाण्याच्या टाकी मंजूर करण्यात आल्या आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: