बातमी कट्टा:- गेल्या अनेक वर्षांपासून बोरगांव गावातून परिसरातील शेतकऱ्यांसाठी शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाची मागणी करण्यात येत होती.येथील बिकट रसत्यामुळे बोरगाव शिवारातील बोरगाव,जातोडा तसेच हिंगोणी येथील शेतकरी परेशान झाले होते.येथील शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागत होता.
तसेच बोरगांव येथे गेल्या 5-6 वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांना पडक्या वर्ग खोलीत जिव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत होते.त्यानंतर एकाच वर्ग खोलीत सर्व विद्यार्थी शिक्षण घेत होते.यामुळे येथे आणखी एक नवीन वर्गखोली व एक वर्गखोली दुरुस्ती करावी यासाठी मागणी करण्यात आली होती.
बोरगावसह जातोडे व हिंगोणी येथील शेतकऱ्यांचे समस्या गांभीर्याने घेत जि प सदस्या सौ अभिलाषाताई भरत पाटील यांनी पाठपुरावा करून अखेर जिल्हा परिषदेच्या योजनेतून वनावल गटाचे जि. प. सदस्या सौ अभिलाषाताई भरत पाटील यांच्या वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे बोरगाव शिवारातील शेतरस्ता व जिल्हा परिषद शालेय शिक्षण समिती मधून मराठी शाळेची नवीन वर्ग खोली मंजूर करण्यात आली. ह्या कामांचे भूमिपूजन शुभारंभ शिसाका संचालक तथा माजी पं स. सदस्य भरत भिलाजी पाटील व पं स.चे माजी उपसभापती जगतसिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत व गावाचे उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला.
माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल,आमदार काशीराम पावरा, शिरपूर न.प. उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, जि. प. अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्ष सौ कुसुम कामराज निकम, जि. प.शिक्षण सभापती सौ मंगला सुरेश पाटील, माजी नगरसेवक अशोक कलाल, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांच्या सहकार्यातुन व मार्गदर्शनाखाली सदर कामे मंजूर करण्यात आली.
यावेळी भूमिपूजन शुभारंभ प्रसंगी पं. स. माजी सदस्य निलेश विश्वासराव पाटील, सरपंच सौ काशीबाई तानकु भिल, माजी सैनिक दगेसिंग राजपूत, विकासो चेअरमन खंडूसिंग राजपूत,ग्रामसेवक बि. डी. राजपूत, विठ्ठल झुलाल कोळी, जयराम पाटील, कौतिक न्हावी, तुकाराम न्हावी, गुलाब फुला भिल,गोलू धुडकू भिल, जातोड्याचे शेतकरी विकासो चे माजी चेअरमन श्री सुभाषचंद्र राजपूत, भरत राजपूत, माजी उपसरपंच जयसिंग राजपूत, हिंगोणीचे शेतकरी अशोक पाटील, जितू पाटील, दगडू पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.