
बातमी कट्टा:- आयुष्यात जे कार्य कराल ते सर्वोत्तम करा,अनेक अडचणी येतील मात्र न डगमगता त्या अडचणींना सामोरे जा आणि दुसऱ्यांची मदत करा असा मोलाचा संदेश आपल्या व्याख्यानातून दिपस्तंभ मनोबल फाऊंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी युवक युवतींना दिला.
धुळे जिल्हा पोलिस दल आणि दिपस्तंभ मनोबल फाऊंडेशन यांच्या तर्फे धुळे आणि शिरपूर येथील महाविद्यालयीन युवक युवतींशी सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिपस्तंभ मनोबल फाऊंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी युवक युवतींशी व्याख्यादरम्यान संवाद साधला.

परिस्थिती कशी का असेना रडत न बसता लढण्याचे ध्ये ठेवायचे आणि पुढे जायचे त्यासोबत समाजा साठी आणि गरजुंसाठी काम करायचे असा संदेश त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिला.यजुर्वेंद्र महाजन यांनी आतापर्यंत अंदाजे 300 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले. 14 विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी तर 500 इतर अधिकारी दोन लाख विद्यार्थी आणि 20 हजार शिक्षकांसोबत वाचन केले तर 1 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देत 2200 व्याख्यान तर आतापर्यंत 10 लाख विद्यार्थींशी त्यांनी संवाद साधला आहे.यजुर्वेंद्र महाजन यांनी आपल्या व्याख्यानातून त्यांच्या आयुष्यातील सर्व चढ उतार सांगत व्याख्यानाची आवड,पुस्तकांची आवड ,व त्यातून समाज,देश आणि माणूस समजायला लागणे त्यासोबत उत्तम संगत व जबाबदारीने क्षेत्र निवडणे का गरजेचे यासर्वांची त्यांनी माहिती दिली.यख व्याख्यानातून हजारोंपैकी शेकडो विद्यार्थी तरी त्यांची दिशा बदलतील आणि आयुष्यात नवीन उर्जेने कार्य करतील असा विश्वास यजुर्वेंद्र महाजन यांनी दिला.यावेळी शिरपूर येथे झालेल्या व्याख्यानात उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे,पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर, सा.पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ,शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे सर्व उपनिरीक्षक आणि पोलिसवृंद उपस्थित होते.