बातमी कट्टा:- जेवण दिले नाही म्हणून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. घटनेनंतर पिंपळनेर पोलीसांनी संशयित पतीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मंगळवारी साक्री तालुक्यातील लखाळे येथील निर्मला गणेश चव्हाण हिचे गणेश एकनाथ चव्हाण वय 29(रा.ताहराबाद,ता.बागलाण जि.नाशिक) याच्याशी प्रेमविवाह झाला होता.मंगळवारी लखाळे येथे रात्री निर्मला चव्हाण हिने गणेश चव्हाण याला जेवण दिले नाही म्हणून दोघांमध्ये वाद झाले.त्यादरम्यान गावातील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीच्या ओट्यावर गणेश याने निर्मला चव्हाण हिला लाकडी दांडक्याने मारहाण केली.यात तिचा जागिच मृत्यू झाला. घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक झाले आहे.या घटनेनंतर सुरमल मंगळ्या पवार वय 32 ,रा.लखाळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गणेश चव्हाण विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेनंतर पिंपळनेर पोलीस स्टेशनचे पथकाने संशयिताला ताब्यात घेतले आहे.