
बातमी कट्टा:- एक पेड मा के नाम या अभियानांतर्गत कुरखळी ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान व शिरपूर सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर येथील महात्मा जोतिबा फुले मल्टीटेक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय सोनवणे, गट शिक्षणाधिकारी जी एल सूरवाडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग शिरपूर भूषण पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी शिरपूर श्रीमती सुवर्णा पवार, माजी सभापती समाज कल्याण विभाग जि प धुळे वसंत पावरा, पंचायत समिती उप सभापती बागूल, ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय हरित सेना समन्वयक योगेश्वर मोरे, कार्याध्यक्ष मनोहर वाघ, उपाध्यक्ष डॉ. दिलीप पाटील, महात्मा जोतिबा फुले मल्टिटेक विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र कापडे , पर्यवेक्षक प्रकाश जाधव , निलेश महाजन , पराडके सर, भैय्या कोळी , लिपिक प्रविण पाटील, पी भदाणे, एम.पी नेरकर, तारकेश्वर काकडे, निता सोनवणे – विस्तारअधिकारी, लेखाधिकारी- संगीता शिंपी, वरीष्ठ सहाय्यक – सुनील भामरे, नीता पाटील- भामपूर, समता बत्तीसे, निर्मला शिरसाठ, शैला पाटील, मनीषा पाटील, जोशना पाटील, मनीषा मोरे, सुरेखा सोनवणे, कविता मोती, कविता गावित, अनिता पाटील, सीमा पाटील, मेघा जाधव, लता शिंदे, किरण पाटील, नितीन पाटील, सीमा बुवा, अनिल चव्हाण, विनोद सिसोदिया, प्रमोद भोई, डी व्ही बोरसे, कैलास बारेला, सपकाळ ताई, सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक व वनपाल तसेच पंचायत समितीचे ग्राम पंचायत विभाग, वित्त विभाग, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, गट साधन केंद्र चे अधिकारी व कर्मचारी तसेच महात्मा जोतिबा फुले विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या ५० कोटी वृक्ष लागवड अभियानात एक पेड मा के नाम या अभियानांतर्गत शिरपूर तालुक्यातील दिवंगत शिक्षक स्व दीपक मोरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या बारा वर्षापासून अविरतपणे वृक्षारोपण, शैक्षणिक, सामाजिक, उपक्रमशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार, आरोग्य व रोजगार क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सामाजिक संस्था ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी, सामाजिक वनीकरण विभाग शिरपूर तसेच राष्ट्रीय हरित सेना अधिनस्त महात्मा जोतिबा फुले मल्टीटेक विद्यालय शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.या अभियानांतर्गत एक पेड मा के नाम या अभियानांतर्गत विद्यालयाच्या परिसरात वड, आवळा, चिंच, करंज, सिसम, सिताफळ यासारखी वृक्षांची लागवड करण्यात आली.