ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानचा तेजोमय सन्मान सोहळा — शिक्षक, आरोग्यसेवक आणि समाजसेवकांचा गौरव!

बातमी कट्टा:- गुरुजनांच्या स्मृतीला अभिवादन आणि समाजहिताच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रेरणादायी उपक्रम — ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान, कुरखळी यांनी सलग १४ व्या वर्षी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ आणि ‘सेवा गौरव पुरस्कार’ सोहळा अत्यंत उत्साहात पार पाडला.

०९ ऑक्टोबर २०२५ रोजी शिरपूर येथील आयएमआरडी महाविद्यालयाच्या एस. एम. पटेल हॉल येथे झालेल्या या समारंभात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. समाजासाठी नि:स्वार्थ भावनेने काम करणाऱ्यांचा सन्मान करून ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान ने पुन्हा एकदा तालुक्याच्या लौकिकात भर घातली आहे.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष जयश्री बेन पटेल, माजी नगराध्यक्ष संगीता ताई देवरे, ज्येष्ठ साहित्यिक एम. के. भामरे, सीईओ उमेश शर्मा, प्रहार संघटनेचे गजानन पाटील, सरपंच सुचित्रा धनगर, माजी उपशिक्षण संचालक शशिकांत हिंगोणेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण पाटील, शिक्षक संघटनेचे शरद सुर्यवंशी यां सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी

मेघा शशिकांत हिंगोणेकर — आदर्श शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा, भूपेशनगर, शिरपूर

स्वाती अनिल जगदाळे — आदर्श शिक्षिका, आर. सी. पटेल मराठी प्राथमिक विद्यालय, वाल्मिक नगर, शिरपूर

दीपक विनायक पाटील — युवा तंत्रस्नेही शिक्षक, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, मांजरोद, शिरपूर

नंदा रतन पाटील — आदर्श मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लौकी, शिरपूर

रविंद्र रामदास सोनगीरे — आदर्श शिक्षक, आर. सी. पटेल इंग्रजी माध्यम विद्यालय, शिरपूर

अनूप चंदेल — आदर्श क्रीडा शिक्षक, आर. सी. पटेल इंग्रजी माध्यम विद्यालय, शिरपूर

सुधाकर भरत वळवी — आदर्श कला शिक्षक, आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय, टेकवाडे, शिरपूर
या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

सन 2025 चा सेवा पुरस्कार

स्वर्गीय शहीद राहुल गोपीचंद पावरा — राष्ट्र सेवा पुरस्कार चा सन्मान त्यांच्या आई-वडिलांना प्रदान करण्यात आला.

.विश्वास सुभाष पाटील — आरोग्य सेवा पुरस्कार, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य उपकेंद्र, कुवे

कृष्णा रामचंद्र भावले — सामाजिक सेवा पुरस्कार, नशामुक्ती अभियान, सातपुडा परिसर

तर योग विद्या धाम, शिरपूर यांना योग सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संस्थेमार्फत विविध क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांची निवड समितीची स्थापना करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण २१ प्रस्ताव प्राप्त झाले होते. काटेकोर विचारविनिमयानंतर वरील गुणवंतांची निवड करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात म्हटले की —
“ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान ही संस्था समाजातील गुणी शिक्षक, आरोग्यसेवक आणि सेवाभावी व्यक्तींची ओळख करून त्यांना सन्मानित करताना कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष व पारदर्शकपणे निस्वार्थ भावनेने कार्य करत आहे. अशा संस्था समाजात प्रेरणादायी दीपस्तंभ ठरतात. गुणवंतांचा सन्मान म्हणजे समाजातील चांगुलपणाचा गौरव आहे.”

कुरखळीतील स्वर्गीय शिक्षक दीपक मोरे व निताबाई मोरे यांच्या प्रेरणेने सुरू झालेला हा उपक्रम आज महाराष्ट्रभर गाजत आहे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कर्तृत्वाला समाजासमोर आणणे — हा ‘ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान’चा खरा हेतू आहे.

त्यांच्या या निःस्वार्थ, पारदर्शक व प्रेरणादायी कार्याची संपूर्ण समाजातून प्रशंसा होत असून, अशा उपक्रमामुळे समाजातील सकारात्मकता आणि सेवा भाव अधिक तेजाळतो आहे.

“ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान” ही केवळ एक संस्था नसून समाजात कार्य करणाऱ्यांच्या प्रकाशाची मशाल आहे. शिक्षक आणि सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान करून ती ‘सेवा, संस्कार आणि सन्मान’ यांचा दीप पेटवत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर वाघ यांनी केले, सूत्रसंचालन यशवंत निखवाडे यांनी तर आभार प्रदर्शन योगेश्वर मोरे यांनी केले.

WhatsApp
Follow by Email
error: