बातमी कट्टा:- मध्यप्रदेश राज्यासह चोपडा, धुळे, शिरपूर आदी ठिकाणी चोरी केलेल्या बुलेट,पल्सरसह आठ मोटरसायकली व एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली पोलीसांनी जप्त करत तीन संशयितांना ताब्यात घेण्यात शिरपूर शहर पोलीसांंना मोठे यश प्राप्त झाले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार शिरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील करवंद गावातील वैतागवाडी येथून दिनांक 7 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शकील शेख गणी यांचे ट्रॅक्टर हे ट्रॉलीसह चोरी झाल्याची घटना घडली होती. याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपासादरम्यान पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे शिरपूर पोलीस स्टेशनचे शोध पथकाने सापळा रचत शिरपूर तालुक्यातील पळासनेर हेंदर्यापाडा येथे कारवाई केली असता मध्यप्रदेश राज्यातील बडवानी जिल्ह्यातील अनिल दिनेश बारेला वय 19 यासह हेंद्र्यापाडा येथील गुड्डु सुभाराम भिल वय 28 व शिवाजी काळू पावरा वय 27 यांना ताब्यात घेतले असतांना त्यांच्या ताब्यातून करवंद येथुन चोरी झालेले जाँडीअर ट्रॅक्टर , ट्रॉलीसह,रॉयल इनफील्ड बुलेट,बजाज पल्सर220 सीसी, बजाज पल्सर 160 सीसी,स्लेंडर प्रो,दोन एच.एफ.डिलक्स, सुपर स्लेंडर व हिरो कंपनीची एच ऐफ डिलक्स अशा एकुण 6 लाख 95 हजार चोरीच्या आठ मोटरसायकलीसह ट्रॅक्टर व ट्रॉली पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर गुन्ह्यात चोरी झालेली मोटरसायकलीतील रॉयल इनफिल्ड बुलेट मध्यप्रदेश राज्यातील खंडवा भागातील नेफानगर येथून चोरी करण्यात आली होती तर चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्लीतून स्पेलेंडर स्प्रो,चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीतून एच एफ डिलक्स चोरी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तर इतर मोटरसायकलीच्या मुळमालकांचा शोध घेणे सुरु आहे.पोलीसांनी तिन्ही ताब्यात घेतले संशयितांना शिरपूर मा.न्यायालयातर्फे एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली असून तिघा संशयितांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह सपोनि गणेश फड,पोहेकॉ ललित पाटील, लादुराम चौधरी,
गोवींद कोळी,विनोद अखडमल,प्रविण गोसावी,मनोज दाभाडे,मुकेश पावरा,अनिल अहिरे,उमेश पवार व प्रशांत पवार आदींनी केली आहे.