
बातमी कट्टा:- शिर्डीहून इंदौरकडे जाणारी ट्रॅव्हल्स पलटल्याची घटना घडली आहे.या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून 22 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना धुळे व शिरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघातात मृत महिलेचे मुंडक छाटले गेले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर धुळे ते शिरपूर दरम्यान दभाषी गावाजवळ आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश राज्यातील खाजगी ट्रॅव्हल्स पलटली.या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला.शिर्डीहून रात्री एमपी 09 पीए 0271 क्रमांकाची हंस खाजगी ट्रॅव्हल्स इंदौरसाठी रात्री निघाली होती. रात्री 2 वाजेच्या सुमारास सोनगीर जवळ ट्रॅव्हल्स चालक क्लिनर जेवणासाठी थांबले होते.
जेवण करुन ट्रॅव्हल्स जाण्यासाठी निघाली तेव्हा पहाटे 3 वाफेच्या सुमारास दभाषी गावाजवळ अचानक ट्रॅव्हल्स पलटली.अपघातानंतर घटनास्थळी मदतकार्यासाठी नागरीकांनी धाव घेतली.जखमींना उपचारासाठी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 8 गंभीर जखमींना धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.तर काही प्रवासींशर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून त्या महिलेचे मुंडके धडावेगळे झाले आहे.
