बातमी कट्टा:- खासगी बसमध्ये चढत असतांनाच चालकाने निष्काळजीपणाने बस चालवल्याने खासगी बसच्या खाली पडून बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.सदर घटना दि 3 रोजी दुपारच्या सुमारास घडली होती.याबाबत दि 8 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जी जे १४ झेड ५५३६ क्रमांकाची साईरथ ट्रॅव्हल्सची खाजगी बस चोपडा येथून सुरत कडे जात असतांना दोंडाईचा- नंदुरबार रस्त्यावर महावितरण कंपनीच्या सबस्टेशन जवळील हॉटेल आशिष समोर त्या बसमध्ये प्रवासी किरण रामा गवळी वय २५ वर्ष रा. दहिवद, ता शिरपूर हा चढत असताना ट्रॅव्हल्स बस चालकाने निष्काळजीपणाने बस चालवली यात
किरण हा बस मधून रस्त्यावर खाली पडून गाडीच्या मागच्या चाकात आल्याने त्यास उजव्या पायावर कमरेखाली मांडीजवळ गंभीर मार लागल्याने रक्तस्त्राव झाला, त्यास रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी साईरथ ट्रॅव्हल्स बस वरील चालकावर मोटार वाहन कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास दोंडाईचा पोलीस कॉन्स्टेबल प्रविण निंबाळे करीत आहे.सदर घटना दि 3 रोजी घडली होती.तर याप्रकरणी दि 8 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.