बघा व्हिडीओ लिंक क्लिक करा https://youtu.be/bWHQ6QzaVVI?si=VughgCDhS1OP3Iv3
बातमी कट्टा:- नंदुरबार लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात टोकरे कोळी समाज देखील उतरणार असल्याचे आजच्या कोळी समाजाच्या बैठकीत ठरले आहे. शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे कोळी समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली असून लवकरच उमेदवार घोषित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बघा व्हिडीओ लिंक क्लिक करा https://youtu.be/bWHQ6QzaVVI?si=VughgCDhS1OP3Iv3
कोळी समाजावर नेहमी अन्याय होत आला आहे.आणि यामुळे टोकरे कोळी समाजाच्या वतीने नंदुरबार लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे.कुठल्याही पक्षाचे मागे न जाता कोळी समाज स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार आहेत.यासाठी आज शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे कोळी समाजाची बैठक संपन्न झाली.यावेळी बैठकीत निवडणूकीत इच्छुक उमेदवारांचा परिचय करण्यात आला.
बघा व्हिडीओ लिंक क्लिक करा https://youtu.be/bWHQ6QzaVVI?si=VughgCDhS1OP3Iv3
या बैठकीत नंदुरबार ,शहादा,सारंगखेडा,शिरपूर तालुक्यातील कोळी समाजाबांधवांची उपस्थिती होती.यावेळी चार जणांनी लोकसभा निवडणुकीत इच्छुक असल्याचे जाहीर केले. उपस्थितांनी उमेदवारांची वेगवेगळे प्रश्न विचारत चाचपणी केली.लवकरच कोळी समाजाकडून सक्षम उमेदवार जाहीर करण्याचा निरधार यावेळी बैठकीत घेण्यात आला.
बघा व्हिडीओ लिंक क्लिक करा https://youtu.be/bWHQ6QzaVVI?si=VughgCDhS1OP3Iv3