डिजीटल पत्रकारितेतुन जनतेचा आवाज ठरलेला बातमी कट्टा!


जेव्हा शासन, प्रशासनाकडून याेग्य ताे न्याय मिळत नाही. तेव्हा सामाजिक प्रश्न, मुलभूत, पायाभूत सुविधा अशा प्रश्नांची उकल करण्यासाठी मिडीयाच्या माध्यमातून जनतेच्या दरबारात न्याय मागावा लागताे. जेव्हा एखाद्या विषयाची बातमी झळकते तेव्हा शासन, प्रशासन यांच्यावर दबाव निर्माण हाेताे. आणि जनतेच्या प्रश्न साेडविण्यात मिडीयाची भुमिका महत्वपुर्ण ठरते. हीच भुमिका बातमी कट्टा च्या माध्यमातून संपादक अमाेल राजपूत यांची असते. तालुक्यातील अनेक समस्या बातमी कट्टाच्या माध्यमातून साेडविल्या जातात. या कालावधीत वाचकांचा विश्वास तर बातमीला सत्याचा आधार देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असताे. नैतिक पत्रकारितासह सामाजिक भान, तर सेवेचे व्रत जाेपासले आहे. तर डिजिटल क्षेत्रात पत्रकारिता क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. या विश्वासाच्या बळावर ६० लाखांच्या जवळपास वाचक संख्या निर्माण केली आहे. भविष्यात देखील आपल्या कतृत्वाचा आलेख वाढता राहाे ह्याच वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा!!!

श्री.सचिन पदमसिंग राजपूत,उपसरपंच तथा गटनेते सावळदे ग्रामपंचायत ता.शिरपूर
धुळे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय सरपंच संघ,

WhatsApp
Follow by Email
error: