डीजे वाजण्यावरुन वाद, दोन गटात तुफान हाणामारी,जखमींवर उपचार सुरु..

बातमी कट्टा:- रंगपंचमीच्या दिवशी दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे.या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत यातील एकाची प्रकृती गंभीर असून धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.साक्री शहरातील चांदतारा मोहल्लात शुक्रवारी दि 18 दुपारी धुलीवंदनाच्या दिवशी डीजे वाजविण्या वरुन दोन गटांमध्ये दंगल झाली यात दोन्ही गटांकडून लोखंडी रॉड,तलवार,गुप्ती,कोयता लाठ्याकाठ्या दगडांचा वापर करत एकमेकांवर हल्ला करण्यात आला.

दोन्ही गटांच्या परस्पर फिर्यादीवरून दोन्ही गटातील प्रत्येकी 10 ते 12 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत चांदतारा येथील मोहल्यातील सुमईया शेख जाकीर शेख वय 27 हिने दिलेल्या आहे की,डिजे बंद करण्यास सांगितले म्हणून काही जणांनी जमाव जमवून आपल्यासह उपस्थितांना लोखंडी रॉड दगडाने मारहाण केली.कुर्ती फाडून विनयभंग केला हाताबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.या प्रकरणी आठ ते दहा संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सुनंदा कैलास रामोळे वय 40 यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की धूलिवंदनानिमीत्त रंगपंचमी खेळत असतांना डीजे बंद करण्याच्या कारणावरून हातात तलवारी,गुप्ती,लाकडी दांडा, कोयता, लोखंडी रॉडने फिर्यादीसह परिवारातील सदस्यांना बेदम मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तुफान हाणामारीत तीन जण जखमी झालेले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर अन्य दोघांवर साक्री येथेच उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली तर धुळे येथून वरीष्ठ पोलीसांसह पथक दाखल झाले आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: