
बातमी कट्टा:- एकेकाळी खासदारकी निवडणूकीत डॉ हिना गावीत यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसून मतासाठी वणवण फिरणाऱ्या मंत्री डॉ विजयकुमार गावीत यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपालसिंह रावल आणि शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी हजारों कार्यकर्त्यांचा मेळावा घेत काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ गोवाल पाडवी यांना पाठिंबा दर्शविला आहे.
नंदुरबार लोकसभा निवडणुकीत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल आणि शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली असून त्यांनी काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.निवडणुकीच्या काळात काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
शहादा येथे जयपालसिंह रावल आणि अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जयपालसिंह रावल आणि अभिजित पाटील यांचे समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली. नंदुरबार जिल्ह्यातील विजयकुमार गावित आणि परिवाराच्या एकाधिकारशाहीला कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचा दोघे दिग्गज नेत्यांनी सांगितले आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकारणात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात.