
बातमी कट्टा:- शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचालित डॉ विजयराव व्ही रंधे इंग्लिश मेडिअम स्कूल शिरपूर येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे समन्वयक जी व्ही पाटील सर उपस्थित होते.

डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमचे अध्यक्ष जी व्ही पाटील यांच्या हस्ते करून विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी शाळेच्या उपशिक्षिका रमाकांती विश्वकर्मा यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमोद पाटील ,सारिका ततार,मनीषा मगरे समाधान राजपूत, रिदवाना शेख, मंजिरी पिंगळे, ज्योती देशमुख,पवित्रा राजपूत कन्हय्या कोळी,विशाल सोनगडे, राजश्री पाटील व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती ठाकरे यांनी केले.तर आभार मनीषा पटेल यांनी व्यक्त केले.
