
बातमी कट्टा:- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत गोरगरीब कल्याणाच्या योजनेंतर्गत देशातील कोट्यावधी गोरगरीबांना लाभ दिलेला आहे तर महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर विधानसभा मतदारसंघात कोट्यावधीचा निधी आणून मतदारसंघ मोठ्या प्रमाणात विकासाची कामे कामे भाजपा सरकारने केलेली आहे म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ हिना गावीत यांना निवडून आणण्यासाठी शिरपूर मतदार संघातील वॉरियर शक्ती केंद्रप्रमुख बूथ प्रमुख यांना महत्त्वाची भूमिका पार पाडून डॉ हिना गावीत यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी कामाला लागावे असे आव्हान आमदार काशिराम पावरा यांनी केले.
ते नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील बोराडी येथील संपर्क कार्यालयाचा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते बोराडी येथे आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हिना गावित यांच्या संपर्क कारल्याचे मोठ्या दिमाखात आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले या वेळी आमदार काशिराम पावरा भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी नंदुरबार लोकसभा प्रमुख डॉ तुषार रंधे, युवा नेते राहुल रंधे, भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर माळी,
भाजपाचे मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा,मार्केट कमिटीचे सभापती के.डी.पाटील , जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील सभापती लताबाई पावरा ,माजी सभापती रतन पावरा, जिल्हा परिषद सदस्य जताबाई पावरा,पंचायत समिती सदस्य, सरीता पावरा,पंचायत समिती सदस्य लिलाबाई पावरा जिल्हा परिषद सदस्य अनिता पावरा,जिल्हा परिषद सदस्य मोगराबाई पाडवी, वसंत पावरा,जयवंत पाडवी, बोराडी सरपंच सुखदेव भिल, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मनजित पावरा, भास्कर बोरसे , राज निकम, चंद्रसिंग पवार, रवींद्र शिंदे, बापू पावरा, संजय पाटील, मनोज सत्तेसा उपस्थित होते.