डोंगर माथ्याच्या पायथ्याशी गांजा शेतीवर कारवाई,4 लाख 14 हजार किंमतीच्या मुद्देमाल जप्त…

बातमी कट्टा:- डोंगर माथ्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतात गांजा लागवड केल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीसांनी छापा टाकत 207 किलो वजनाचा 4 लाख 14 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयिता विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा गाव शिवारातील शेतात गांजाची झाडे असल्याची माहिती मिळाल्यावरून सांगवी पोलिसांनी छापा टाकला असता २०७ किलो वजनाचे गांजाची ओली झाडे असा एकुन ४ लाख १४ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि २ रोजी सांगवी पोलिस ठाण्याचे सुरेश शिरसाठ यांना महादेव दोंदवाडा शिवारात शेतात गांजा सदृश अंमली पदार्थाच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केलेली असल्याची माहिती मिळाली होती त्याम माहिती नुसार सांगवी पोलिस स्टेशनचे अधिकारी,कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखा व आरसीपी पथकाने दुर्गम अशा डोंगराळ भागात पायी जावून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वनजमिनी क्षेत्रात गेले असता तेथे एका शेतात गांजाची झाडांची लागवड केलेली दिसून आली.यावेळी पोलीसांनी कारवाई केली असता यात एकुण २०७ किलो २०० ग्रॅम वजनाचे गांजा सदृश्य ओली झाडे उपटविण्यात आली असून ४ लाख १४ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बुधा पावरा याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई सांगवी पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ,पोसई भिकाजी पाटील, पोसई नरेंद्र खैरणार, हवालदार लक्ष्मण गवळी, राजेंद्र मांडगे, संजय माळी, संजय देवरे, जाकीर शेख, चत्तरसिंग खसावद, रणजित वळवी, योगेश मोरे, प्रकाश भील, संतोष पाटील, इसरार फारूकी, सपोनि प्रकाश पाटभल, योगेश राऊत, रफीक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैंसाणे, अशोक पाटील, संदीप सरग, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, गौतम सपकाळे, राहुल सानप, कमलेश सुर्यवंशी, मधू पाटील, महेंद्र सपकाळ यांच्या पथकाने केला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: