डोक्यावर रुमाल टाकले,लिंबू कापले,तोंडासमोर पावडर उडवली आणि अत्याचार केला…त्या फरार झालेल्या अत्याचारी बाबाला अटक

बातमी कट्टा अमोल राजपूत 9404560892:- इलाज करण्याचे आमिष दाखवत भोंदू बाबा पिडीतेला खोलीत घेऊन गेला लाईट बंद करुन पिडीतेच्या डोक्यावर रुमाल टाकला, डोक्यावर लिंबू कापून तोंडा समोर पांढरी पावडर उडवली आणि पिडीतेवर अत्याचार केला.या घटनेनंतर हा अत्याचारी बाबा फरार होता.त्याचा शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे यांच्या पथकाने कसून शोध घेत त्या अत्याचारी बाबाच्या अखेर मुसक्या आवळल्या आहेत.

पिडीतेला भूतांचे स्वप्न आणि चक्कर, डोके दुखीचा वारंवार त्रास होत असल्याने तीच्या आई आणि कुटूंब त्रस्त होते. पिडीतेला या त्रासापासून मुक्तता मिळावी यासाठी कुटूंब हतबल होते. या दरम्यान पिडीतेचे आजोबांनी पिडीतेच्या आईंना फोन करुन एका बाबाची माहिती दिली.जडीबुटी देऊन बाबा आजार बरा करतो असे सांगितले.यासाठी त्या बाबाने ५ हजार रूपये ओनलाइन ऍडवान्स घेतले. आणि दि ९ रोजी पिडीता तीच्या आई आणि मोठ्या भावांसोबत बाबा येत असलेल्या ठिकाणी पोहचले.

पिडीता पोहचली त्यावेळी तिथे ४० ते ४५ वयोगटातील तीन अनोळखी बाबा जडीबुटी देण्यासाठी आलेले होते. त्यातीला एकाने पिडीतेचा इलाज करतो सर्वजण बाहेरच्या खोलीत बसा एक ते दिड तास कोणीही आतल्या खोलीत येऊ नका असे सांगून पिडीतेला आतल्या खोलीत नेत खोलीचा लाईट बंद केला.तेथे पिडीतेच्या डोक्यावर रुमाल टाकून लिंबू कापले व तोंडासमोर पांढऱ्या रंगाची पावडर उडवली आणि पिडीतेवर अत्याचार केला.

पिडीताने त्या आरडाओरड करत अत्याचारी बाबाकडून सुटका केली.आरडाओरड करत आईला आतल्या खोलीत बोलवले. यावेळी पिडीता घाबरली होती.घरी जाण्यासाठी निघाल्यानंतर पिडीताने आई आणि भाऊला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. पिडीता आई व भाऊ सोबत शिरपूर शहर पोलिस स्टेशन येथे येऊन घटनेची माहिती देऊन अत्याचारी बाबा विरुध्द गुन्हा दाखल केला.

अन् पोलिसांनी आवळल्या अत्याचारी बाबाच्या मुसक्या

या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला.या प्रकरणी संपूर्ण बारकाईने अभ्यास करत पोलिस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अत्याचारी बाबाच्या शोधात निघाले. शोध सुरु असतांनाच हा अत्याचारी बाबा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वाघूलखेडा येथील असून त्याचे नाव पिंटू ऊर्फ अर्जून पंडीत अहिरे वय ४२ असे असल्याचे समजले. संशयिताने सोबत मोबाईल ठेवला नसल्याने त्याचा शोध लावणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते.वेगवेगळ्या पध्दतीने त्याचा कसून शोध सुरु असतांनाच मालेगाव जवळील चंदनपूरी येथील यात्रोत्सवात एका दूकानावर तो काम करत असल्याचे पोलिसांना समजले. मात्र यात्रोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने त्याचा शोध घेणे महत्वाचे होते.

यात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी त्याचा शोध लागला नाही तर तो हाती लागणार नाही याची पोलिसांना काळजी होती. पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी तात्काळ पोलिस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे यांच्या पथकाला चंदनपूरी यात्रोत्सवात रवाना करुन संशयिताचा शोध घेण्याबाबत आदेश केले.यावेळी प्रत्येक दुकानांवर त्याचा शोध सुरु असतांनाच एका दुकनातून पोलिसांनी मोठ्या शिताफीने संशयित अत्याचारी बाबा पिंटू ऊर्फ अर्जून पंडीत अहिरे याला ताब्यात घेतले.यात्रोत्सवाच्या गजबजलेल्या गर्दीच्या ठिकाणाहून त्याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेत शिरपूर शहर पोलिस स्टेशन येथे हजर करण्यात आले.पोलिस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे,पोलिस कॉन्स्टेबल सोमा ठाकरे,गोपाल माळी यांनी यासाठी परिश्रम घेतले आहे.

अमोल राजपूत 9404560892

WhatsApp
Follow by Email
error: