बातमी कट्टा:- समाजात वावरत असतांना आपण कोणा सोबत आहोत आपली मैत्री कोणासोबत आहे.आयुष्याच्या रस्त्यावर आपण योग्य पध्दतीने चालत आहोत का ? याचा विचार करणे गरजेचे आहे.नाहीतर तुमच्या सुखी आयुष्याला घरघर लागल्या शिवाय राहणार नाही.हे लिहीण्याचे कारण असे की,परवा शिरपूर पोलीसांनी बनावट नोटा प्रकणी केलेली कारावाई !
शिरपूर शहर पोलीसांनी बनावट नोटा छापणाऱ्या दोघे मित्रांच्या मुसक्या आवळल्या होत्या.दोघेही संशयित सावळदे येथील आहेत.यातील धनंजय तरुण हा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. घरच्यांनी आपला धनंजय भावी इंजिनिअर बनेल असे स्वप्न बघितले होते.मात्र या भावी इंजिनिअरने एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाशी मैत्री केली होती. ज्या तरुणावर याआधी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्याशी धनंजय याने मैत्री केली.
मैत्रीत धनंजय गुरफटला गेला आणि नको त्या धंद्यात धनंजय शामील झाला.स्वताच्या आलीशान घराच्या वरच्या मजल्यावर धनंजय याने स्वताच्या रुममध्ये प्रिंटर मशीन ठेऊन बनावट पाचशे रुपयांचा नोटा छपाई केल्या आणि मुकेशने कटींग करुन बाजारात विक्रीसाठी आणल्या होत्या. त्यांचा या गोरखधंद्याचा पोलीसांना सुगावा लागला आणि दोघांचेही पितळ उघडे पडले.
धनंजय कोळी हा सिव्हिल इंजिनिअरींगच्या तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता.त्याच्या घरच्यांनी देखील धनंजयकडे भावी इंजिनीअर म्हणून बघितले होते.मात्र ढेकणाच्या संगतीने हिरा भंगला प्रमाणे गुन्हेगाराशी मैत्री भावी इंजिनिअरला नडली आणि आता दोघेही पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत.आयुष्यात आपला संगती कोण आपण कोणा सोबत वावरत आहोत आपली मैत्री कोणासोबत आहे हे बघणे गरेजेचे आहे.अन्यथा हिराचा ढेकण बनल्याशिवाय राहणार नाही हे नक्की….