
बातमी कट्टा:- हातात बियरच्या बोटल घेऊन नशेत “हमको ढोलक दो हमको बजाना है” तेव्हा ढोलकी विक्रीत्याने “अभी हमारे पास बना हुवा ढोलक नही है,आप सुबह आके लेके जाना”असे सांगितल्याचा राग आल्याने संशयितांनी ढोलक बनवणाऱ्या कुटूंबीयावर प्राणघातक हल्ला केला यात एकाच्या डोक्यात गंभीर घाव झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाला असुन उपचारासाठी धुळे येथे पाठविण्यात आल्याची फिर्याद दाखल करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
बघा व्हिडीओ
https://youtu.be/xcd93hk0cSs?si=dOdBTgTIcigj1MPm

शिरपूर शहर पोलिस स्टेशन येथे मोहम्मद शाबीर मोहम्मद बशीर वय ५० रा.कजरी,भोपाल मध्यप्रदेश यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटल्यानुसार मोहम्मद शाबीर मोहम्मद बशीर हे गेल्या १५ दिवसांपूर्वी पासून कुटूंबासोबत शिरपूर जवळील आमोदे येथील मोकळ्या पटांगणात ढोलकी बनवून ते गवोगावी व यत्रोत्सवात विक्री करत आपला उदरनिर्वाह करतात.ते ढोलकी बनवत असलेल्या ठिकाणीच राहत आहेत.
बघा व्हिडीओ
https://youtu.be/xcd93hk0cSs?si=dOdBTgTIcigj1MPm

काल दि १० रोजी रात्री मोहम्मद शाबीर मोहम्मद बशीर हे कुटुंबीयांसोबत झोपण्याच्या तयारीत असतांना पटांगणातील वाळुच्या ढिगाऱ्यावर बसून दारु पिणारे चार संशयित त्यांच्या झोपडीकडे बियरच्या काचेच्या बोटल हातात घेऊन आले आणि हमको ढोलक दो हमको बजाना है” तेव्हा ढोलकी विक्रीत्याने “अभी हमारे पास बना हुवा ढोलक नही है,आप सुबह आके लेके जाना”असे सांगितल्याने संशयितांना राग आला त्यांनी शिवीगाळ करत हातात असलेल्या काचेच्या बाटल्या,चाकु व तेथे पडलेल्या लाकडी दांडक्याने मारण्याची धमकी दिल्याने मोहम्मद शाबीर मोहम्मद बशीर हे घाबरून तेथून पळायला लागले त्या संशयितांनी पाठलाग करत मोहम्मद शाबीर मोहम्मद बशीर यांना लाकडी दांडका मारुन फेकला.
तेथून मोहम्मद शाबीर मोहम्मद बशीर यांच्यासह सर्व जण पोलिस स्टेशनात आले त्यांनी पोलिसांना माहिती यानंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेले असता तेथे यांच्यातील रिजवाना मेहराज खान यांनी सांगितले की हल्ला करणारे परत गेल्यानंतर तेथे ढोलक विक्रेते साजीद खान यास चाकू आणि लाकडी धांडक्याने व त्यांच्या हातातील काचेच्या बाटल्यांनी मारहाण केली.
साजीद खान याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले असून साजिद खान यांची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी आमोदे येथील रवींद्र भिल,भाईदास भिल,संदिप भिल ,सतिष बैसाणे या चार संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला असुन रवींद्र भिल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
बघा व्हिडीओ
https://youtu.be/xcd93hk0cSs?si=dOdBTgTIcigj1MPm