
बातमी कट्टा:- गावठी बनावट पिस्तूल बाळगणाऱ्या विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली असून घराच्या झाडाझडती घेतली असता एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे असा एकुण 26,500/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस असल्याचे बघुन संशयित फरार झाला आहे.

धुळे जिल्ह्यातील दि 1 मे ते 15 मे पर्यंत बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या संशयितांविरुध्द विशेष मोहिम राबवत कारवाई करण्यात येत आहे.दि 11 मे रोजी स्थानिक गुन्हा नाखेच्या पथकाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे रात्री 22:45 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर तालुक्यातील हिसाळे जवळील गोरक्षनाथ पाडा येथील अत्तरसिंग गुजा पावरा याच्या घरावर छापा टाकला यावेळी पोलीस असल्याचे बघुन अत्तरसिंग पावरा मागच्या दरवाजाने जंगलाच्या दिशेने फरार झाला.त्याच्या घराची झाडझडती घेतली असता घरात 25 हजार किंमतीची बनावट पिस्तूल व तीन काडतुसे जप्त करण्यात आले आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत,श्रीकांत पाटील,प्रभाकर बेसाणे, संजय पाटील, मयुर पाटील, महेंद्र सपकाळ,कैलास महाजन आदींनी कारवाई केली आहे.
