तब्बल 20 लाख किंमतीचे “गांजा”ची झाडे जप्त..

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील गदडदेव शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वनजमिनीवर गांजा झाडांची लागवड केल्याचे आढळून आल्याने शिरपुर तालुका पोलिसांनी छापा टाकला असता २० लाख ५० हजार रुपये किमतीचा १ हजार २५ किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत.

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या गढडदेव शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वनजमिनीवर मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा अदृश्य अंमली पदार्थ गांजा झाडांची लागवड केली असल्याची गोपणीय माहिती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे दि ११ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एक पथक तयार करून घटनास्थळी छापा टाकला असता अवैद्यरित्या गांजाच्या झाडांची लागवड केलेली आढळून आली.त्या गांजाच्या झाडांना मुळासकट उपटून गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. त्यांची मोजमाप केली असता १ हजार २५ कीलो वजनाच्या २० लाख ५० हजार रुपये किमतीचे गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. संशयित आरोपी कोकराम रेशा पारा हा पोलीसांना बघून तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट,उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, असई लक्ष्मण गवळी, पोना संजय धनगर गंगाधर सोनवणे भूषण चौधरी संजय देवरे शहीद शेख संतोष पाटील यांनी केले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: