तरुणांनी 3 लाख किंमतीच्या दागिन्यांची “ती” पर्स केली परत…

बातमी कट्टा:- रसवंतीवर रस पिण्यासाठी आलेल्या परिवाराने तिन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेली पर्स तेथेच विसरून निघून गेले होते.अखेर चिमठाणे व साळवे येथील तरणांनी ती पर्स सुखरूपपणे कुटूंबीयांना परत केल्याने या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की तऱ्हावद तालुका तळोदा येथील मुकेश पाटील हे नोकरीनिमित्त पुणे येथे राहतात. ते सुट्टीचा कालावधी असल्याने पुण्यावरून आपल्या गावाला म्हणजे तऱ्हावद तालुका तळोदा या ठिकाणी यायला निघाले. धुळे येथे बराच उशीर झाल्याने त्यांनी एका हॉटेलवर थांबून जेवण केले. त्यानंतर ते परत आपल्या वाहनाने गावाकडे निघाले असता चिमठाणे येथे एकता रसवंती ठिकाणी थांबले आणि त्यांनी उसाचा रस घेतल्यानंतर ते लागलीच आपल्या गावाच्या दिशेने निघाले.त्यांच्या जवळ असलेली पर्स त्याठिकाणी ते विसरून गेले. काही वेळानंतर त्या ठिकाणी निंबा गिरासे, गौरव गिरासे, गणेश पाटील,अमोल भारती,परेश कोळी, तुषार चौधरी, भूषण पाटील आदीजण रसवंतीवर आले तेव्हा त्यांना पर्स असल्याचे निदर्शनास आले पर्स उघडून बघितली असता त्या पर्समध्ये ३ तोळे वजनाची सोन्याची चैन,त्याचबरोबर सोन्याची पोत तसेच रोख रक्कम असा ऐवज आढळून आला.तरुणांनी पर्स मध्ये असलेल्या सोनाराच्या पावतीवरून संपर्क साधला मात्र पावतीवर मुळ मालकाचे संपर्क क्रमांक नसल्याचे सोनाराने सांगितले.

तर एकीकडे पर्स विसरून मुकेश पाटील यांचे कुटुंब दोंडाईचाच्या पुढे पर्यंत निघून गेले होते.पर्स मध्ये अंदाजे तिन लाखांपेक्षा जास्तीचे दागिने असल्याने तरुणांनी ती पर्स स्वता जवळ ठेऊन त्या कुटुंबीयांना संपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने प्रयत्न करण्यात आला.दोंडाईचा शहराच्या पुढे गेल्यानंतर मुकेश पाटील यांच्या कुटुंबीयांना जवळ असलेली पर्स नसल्याचे समजले.पर्समध्ये मौल्यवान दागिने असल्याने सर्वच जण घाबरले.दागिन्यांची पर्स कुठे असेल,ती पर्स रसवंतीवर असणार तर ठेऊन कोणी पळवून तर नेली नसणार ना अशी चिंता भयभीत करत होती त्यांनी पुन्हा रसंवतीकडे वाहन फिरवले.

यावेळी रसवंतीवर पोहचल्यानंतर कुटुंबीयांनी पर्स बाबत तेथे विचारपूस केली असता तरुणांनी कुटुंबीयांची हकीकत समजून ती मौल्यवान दागिन्यांची पर्स त्यांच्या ताब्यात दिले.यावेळी पर्स बघून कुटुंबीय भावूक होत त्या पर्समध्ये तिन लाख किंमतीचे दागिने असल्याचे सांगितले. तरुणांनी माणूसकीचे दर्शन दाखल्यामुळेच पर्स मधील मौल्यवान वस्तू सुखरूप मिळाल्याचे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

WhatsApp
Follow by Email
error: