तरुणाचा तापी नदीत आढळला मृतदेह

बातमी कट्टा:- हातमजूरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणाने तापी नदी पात्रात काल दि 6 रोजी उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती.आज दि 7 रोजी सकाळच्या सुमारास त्याचा तापी नदीपात्रात मृतदेह आढळून आला.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार नरेश पुनम पाथरे वय २७ रा.धुळे, ह.मु. संत रोहिदास नगर,रा.शिरपूर हा काल दि ६ रोजी सावळदे तापी नदी पात्रात उडी घेतल्याची घटना घडली होती.याबाबत नातेवाईकांना माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी तापी पुलावर धाव घेतली असता पुलावर  कपडे,पिशवी,चपल्ल आढळून आले होते.त्याचा तापी नदीपात्रात शोध सुरू असतांना आज दि 7 रोजी सकाळच्या सुमारास नरेश पाथरे याचा तापी नदीपात्रात मृतदेह आढळून आला.आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले,आई वडील आणि दोन भाऊ होत.

WhatsApp
Follow by Email
error: