बातमी कट्टा:- शिरपूर ते शिंदखेडा रस्त्यावरील तापी नदीपुलावरुन 24 वर्षीय तरुणाने तापी उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज दि 21 रोजी सायंकाळी घडली आहे.पुलावरून जाणाऱ्या प्रवासीने तरुणाचा बुडतांनाचा व्हिडीओ काढला असून रात्री उशिरापर्यंत पाण्यात त्याचा शोध घेणे सुरु होता.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील टेंभे बु.येथील सुरेंद्र सरदारसिंग राजपूत वय 24 हा आज सायंकाळी डिस्कवर कंपनीच्या मोटरसायकलीने गिधाडे गावाजवळील तापी पुलावर आला.पुलावर मोटरसायकल उभी करुन त्याने तापी नदीत उडी घेतली.पुलावरुन वाहतूक करणाऱ्या एका प्रवासीने त्याला उडी घेतांना बघितल्यानंतर आरडाओरड झाल्याने घटनास्थळावर नागरिकांनी धाव घेतली.यादरम्यान तो पाण्यात बुडत असतांंनाचा व्हिडीओ यावेळी एका प्रवासीने काढला.सदर मोटारसायकल वरुन तरुणाची ओळख पटल्यानंतर घटनास्थळी टेंभे येथील ग्रामस्थांसह नागरिकांनी धाव घेतली.त्याचा तापी नदीत शोध सुरु असतांना रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. रात्री तापी पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.सुरेंद्र राजपूत हा कृषी क्षेत्रातील कंपनीत मार्केटिंगचे काम करत होता.