तरुणाला तिक्ष्ण हत्याराने भोसकले, खूनाच्या घटनेने खळबळ

बातमी कट्टा:- तिक्ष्ण हत्याराने तरुणाचा भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे. पहाटेच्या सुमारास घटना उघडकीस आली असून पोलीसांकडून घटनास्थळी तपास सुरु आहे.

शिरपूर तालुक्यातील कोडीद परिसरातील तेल्यामहू पाड्यात राहणारा नानसिंग सहयजा पावरा या २६ वर्षीय अविवाहित तरुणाचा पहाटेच्या सुमारास नाल्याजवळील रस्त्याच्या बाजूला रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. नानसिंग पावरा याच्यावर अज्ञात संशयिताने पोटावर,डोक्यावर आणि छातीवर भोसकून खून करण्यात आल्याचे उघड झाले.घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत चौकशी करण्यात आली.याबाबत पुढील तपास सुरु आहे.खूनामागील कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्यासह फॉरेन्सिक पथकासह,श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: