

बातमी कट्टा:- मोटरसायकलीने घरी जात असतांना मोटरसायकलीचा अपघात झाला जखमी अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल केले मात्र गंभीर जखमी झाल्याने धुळे घेऊन जातांना रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात झाला आणि रुग्णवाहिकेच्या अपघातात त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

शहादा तालुक्यातील असलोद येथील जयपाल रुपसिंग गिरासे या २५ वर्षीय तरुणासोबत अत्यंत दुर्दैवी घटना घडली.जयपाल गिरासे नेहमीप्रमाणे काल दि १४ रोजी मोटरसायकलीने शहादा येथून घरी असलोद जात असतांना सायखेडा गावाजवळ मोटरसायकलीचा अपघात झाला.यावेळी जयपाल गिरासे याला जखमी अवस्थेत उपस्थितांनी शहादा येथील सार्थक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.गंभीर जखमी असल्याने जयपाल गिरासे याच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी धुळे रवाना करण्याबाबत डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

उपस्थितांनी तात्काळ जयपाल गिरासे याला धुळे रवाना करण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली.यावेळी जखमी अवस्थेत जयपाल गिरासे याच्या दोन जण रुग्णवाहिकेत बसून धुळ्याकडे रवाना झाले.भर पावसात रुग्णवाहिका धुळ्याकडे जात असतांनाच निमगुळ गावाजवळ रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला.या अपघातात रुग्णवाहिका दोन ते तीन वेळा पलटली.घटनास्थळी मदतकार्यासाठी नागरिकांंनी धाव घेतली रुग्णवाहिकेतील सर्वांना उपचारासाठी दोंडाईचा येथे पाठवण्यात आले.मात्र यावेळी जयपाल गिरासे या तरुणाचा मृत्यू झाला होता.
जयपाल गिरासे घरातील एकुलता एक मुलगा होता. बहिण विवाहित आहे.कोरोना काळात वडीलांचे निधन झाल्याने घराची संपूर्ण जबाबदारी जयपाल गिरासे याच्यावर होती.या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
