तरुणावर चॉपरने वार, गोळीबार झाल्याची चर्चा,काय म्हणालेत अप्पर पोलीस अधीक्षक ? बघा व्हिडीओ

बातमी कट्टा:- धुळ्यात गरबाच्या ठिकाणी खून्नस दिल्याच्या वादातून एकावर चॉपरने वार करण्यात आला या दरम्यान गोळीबार झाला मात्र नेम चुकविल्याने अनर्थ टळला. याप्रकरणी देवपूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जखमी अवस्थेत तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बघा व्हिडीओ

याप्रकरणी महेश ऊर्फ बाळा बैसाणे यांंनी देवपूर पोलीस स्टेशनात फिर्याद दिली असून यात म्हटले की,महेश व त्याचा भाऊ अरविंद बैसाणे सोबत मित्र सचिन ठाकरे, यशोरत्न वाघ, चेतन सोनार, रोशन खैरनार, अनिकेत यांच्यासह बुधवारी रात्री साडेनऊ ते साडेदहादरम्यान बडगुजर कॉलनीतील गरबा मंडळाच्या ठिकाणी गेले होते. तेव्हा तेथे मित भामरे (रा. गौतमनगर, गोंदूर रोड, धुळे), दादू कपूर (रा. एकतानगर, बिलाडी रोड, देवपूर), प्रशीक वाघ (रा. वाडीभोकर, धुळे) व त्यांचे अन्य ८ ते १० मित्र तेथे आले होते.

बघा व्हिडीओ

फिर्यादी महेश ऊर्फ बाळा व त्याचा भाऊ अरविंद बैसाणे तसेच त्यांचे मित्र गेल्या सहा-सात महिन्यांपासून दुसऱ्या गटाशी बोलत नसल्याने व किरकोळ वाद असल्याने गरबा पाहताना संशयित भामरे, कपूर व साथीदारांनी महेश व अरविंद याला खुन्नस दिली. नंतर त्यांना गोंदुर रोडवरील शनी मंदिर चौकात या असे सांगितले.यानंतर महेश व अरविंद तेथे वाद मिटविण्यासाठी गेले यावेळी तेव्हा अरविंद यास कानाखाली मारत आणि प्रशीकने अरविंद याला पाठीमागून धरत भामरे याने त्याच्याजवळील चॉपरने डाव्या बाजूला पोटाच्या खाली कंबरेवर वार केल्याने अरविंद गंभीर जखमी झाला, त्याला ठार करण्याचा प्रयत्न केला. तसेच मित व दादू याने पिस्टल काढत गोळीबार केला. मात्र, महेश बैसाणे याने नेम चुकविल्याने अनर्थ टळला.तसेच महेश याचा मित्र चेतन सोनार याला मारहाण केली. अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.हल्ल्यात अरविंद गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी संशयित मित भामरे, दादू कपूर, प्रशीक वाघ यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बघा व्हिडीओ

घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक सचिन हिरे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, देवपूरचे पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. गुरुवारी सकाळी फॉरेन्सिक व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले.घटनास्थळी गोळीबाराचे कुठलेही पुरावे पोलीसांना मिळुन आलेले नाही. पोलीसांकडून मात्र त्या दृष्टीने तपास सुरु आहे.

WhatsApp
Follow by Email
error: