बातमी कट्टा:- कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या तालुकास्तरीय पीक स्पर्धेत खर्दे खु ता. शिरपूर येथील सचिन पाटील यांचा गौरव करण्यात आला.रब्बी हंगामात हरभरा पिकाचे उत्कृष्ट उत्पादन घेतल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय रब्बी हंगाम सन 2020-21 स्पर्धा राबविण्यात आलेली होती.सदर स्पर्धेत तरुण शेतकरी सचिन जगन्नाथ पाटील खर्दे खु यांना रब्बी हंगामात हरभरा पिकाचे उत्कृष्ट उत्पादन घेतल्याबद्दल 1 जुलै रोजी हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक कृषि दिनाच्या निमित्ताने गौरव करण्यात आला.कार्यक्रमास धुळे जि प अध्यक्ष तुषार भाऊ रंधे, शिरपूर प.सं सभापती सत्तारसिंग पावरा,उपसभापती सौ पल्लवी योगेश बोरसे, तालुका कृषी अधिकारी अनिल निकुंभ यांच्या शुभहस्ते गौरव समारंभ संपन्न झाला.

सभापती सत्त्तारसिंग पावरा यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,सचिन पाटील सारख्या तरुण शेतकरींकडून प्रेरणा घेत तालुक्यातील इतर शेतकर्यांनीही अशीच उत्तम शेती करावी व भरघोस उत्पन्न घेऊन आपले कुटुंब समृद्ध करावे.शेती व्यवसायात नव्याने येणाऱ्या तरुण शेतकर्यांना सचिन पाटील सारख्या शेतीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांनी मार्गदर्शन करायला असे यावेळी ते म्हटले, मंडळ कृषी अधिकारी विशाल मोटे,कृषीसहाय्यक किरण पाटील,निलेश पाटील,कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभली.सचिन पाटील यांनी मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे .