बातमी कट्टा:- शेतात फवारणी करतांना विषबाधा झाल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल दि 8 रोजी घडली असून याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार (होळनांथे)अजंदे येथील अजय काशिनाथ भोई या 25 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नुसार अजय काशिनाथ भोई हे 25 वर्षीय तरुण शेतकरी शेतात फवारणी करण्यासाठी गेले होते.फवारणी करतांना त्यांच्या नाकातोंडात विषारी औषध गेल्याने त्यांना विषबाधा झाली. मोठा भाऊ गोपाल भोई शेतात गेले असता अजय भोई झोपडीत झोपलेल्या आवस्थेत दिसून आला.त्याला उठवण्यासाठी आवाज दिला आसता अजय भोई यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
याबाबत थाळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक योगेश बोरसे यांना माहिती देऊन थाळनेर पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे.