तरुण शेतकऱ्याची आत्महत्या…

बातमी कट्टा:- पाऊसाने पाट फिरवली त्यात कर्जपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने शेतात विषारी औषध प्राषन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील तरुण शेतकरी नामदेव सुरेश चव्हाण यांनी शेतात विषारी औषध प्राषन करुन आत्महत्या केली आहे.नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील शेतकरी नामदेव चव्हाण यांचे आपल्या शेतीवर उदरनिर्वाह आहे.संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून असतांना पाऊसाने पाठ फिरवली त्यांच्यावर असणाऱ्या कर्जपणाला कंटाळून नामदेव चव्हाण यांनी शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.नामदेव चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार होत.

WhatsApp
Follow by Email
error: