बातमी कट्टा:- कर्ज व अतिवृष्टी मुळे होणाऱ्या नुकसानीच्या चिंतेत तरुण शेतकऱ्याने शेतातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नुसार या तरुण शेतकऱ्याने कर्ज काढून 4 एकर शेतामध्ये कपाशीची लागवड केली होती.मात्र अतिवृष्टी मुळे उत्पन्न येणार नाही या विवंचनेत आत्महत्या केली.
धुळे तालुक्यातील देऊर बु.येथील 34 वर्षीय तरुण शेतकरी योगेश बाबुराव शेवाळे यांनी या वर्षी कर्ज काढून शेतामध्ये कपाशीची लागवड केली होती.मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे कपाशीच्या कैर्या सडल्या,पिकांचे नुकसान झाले.उत्पन्न येणार नाही या चिंतेत शेतकरी योगेश शेवाळे यांनी शेतात असलेल्या घरात गळफास घेऊन जिवनयात्रा संपवली.सेंट्रल बँकेतून 99 हजार रुपये तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीतून कर्ज घेतले होते.शेतात पैसा लावून सुध्दा अतिवृष्टी मुळे उत्पन्न येणार नसल्याने नाही शेतकरी योगेश चिंतेत होते.घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती.
चुलत भाऊ नितीन शेवाळे यांनी योगेश शेवाळे यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृतघोषित केले.यावेळी आमदार कुणाल पाटील, माजी आमदार शरद पाटील, आरोग्य सेवक गोकुळ राजपूत,एस.पी.देवरे,संपर्क प्रमुख सागर पाटील, नवल देवरे,मधुकर देवरे,सागर देवरे आदी जण रुग्णालयात दाखल झाले होते.