बातमी कट्टा:- शेतीवरच उदरनिर्वाह असलेल्या तरुण शेतकऱ्याने शेतात काहीच उत्पन्न येत नसल्याने कर्जबाजारीपणाच्या नैराश्यात तापीनदीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.
आज सकाळी शिरपूर तालुक्यातील गिधाडे तापी पुलावरुन नदीपात्रात एका तरुणाने उडी घेतल्याची घटना घडली होती.नागरिकांनी तात्काळ धावपळ करत मदतकार्य सुरु करुन पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून शोध घेतला असता त्याचा मृतदेह मिळून आला.सदर मृतदेह महेंद्र युवराज पाटील 32 रा नेवाडे ता.शिंदखेडा जि धुळे याचा असल्याचे समजले.
मयत महेंद्र पाटील याचे काका मोतीलाल लुका पाटील यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनात नोंद केली आहे. त्यात म्हटले की,महेंद्र युवराज पाटील वय 32 हा त्याच्या आईसोबत नेवाडे येथे राहतो.शेती व्यवसाय करुन त्यावर त्याचा उदरनिर्वाह होता.मात्र शेतात काहीएक उत्पन्न येण नसल्याने महेंद्र पाटील कर्जबाजारी झाला होता.महेंद्र पाटील कायम नैराश्यात राहत होता.आज दि 8 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास आईसाठी औषधी घेण्यासाठी जात असल्याचे सांगून गेला.व त्यानंतर महेंद्र पाटील याने गिधाडे तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कळाल्यानंतर महेंद्र पाटील याचा मृतदेह शिंदखेडा रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे.